दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिर्डीत येतात.
तसेच साईबाबांच्या श्रद्धेपोटी भाविक लाखो रूपये, सोने-चांदी तसेच इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात.
कोरोना महामारीनंतर साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी साईंच्या दानपेटीत भरभरून दान दिले असून
ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत एकूण
188 कोटी 55 लाख रुपये साईंच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
कोविड काळानंतर साई मंदिर पुन्हा भाविकांसाठी सुरू झाल्याने देशभरातील साईभक्तांची रेलचेल पुन्हा सुरु झाली आहे. तसेच यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला पुन्हा सुरुवात झाली आहे हे मात्र नक्की.