सलमान खानच्या आगामी 'कभी ईद, कभी दिवाली' या चित्रपटाचे नाव बदलून 'भाईजान' असे करण्यात आले आहे.
'भाईजान' चित्रपट रिलीज आधीच प्रचंड चर्चेत आहे. आधी नाव बदलल्यामुळे, तर आता या चित्रपटात अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या एन्ट्रीची बातमी समोर आल्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मात्र, या वृत्तांवर पलक तिवारीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
सलमान खानला मनोरंजन विश्वात 'गॉडफादर' म्हटले जाते आणि सलमान खानने यापूर्वीही पलकचे कौतुक केले आहे.
पलक तिवारी 'बिग बॉस 15' च्या एका एपिसोडमध्ये दिसली होती. यावेळी सलमान खानने पलकचे तोंडभरून कौतुक केले.
इतकेच नाही, तर सलमानने पलकसोबत तिच्या 'बिजली बिजली' गाण्याची हुक स्टेपही केली होती.
पलकने सलमान खानच्या 'अंतिम : द फायनल ट्रुथ' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
सलमान खानच्या या चित्रपटात केवळ हिंदीच नाही, तर पंजाब आणि दक्षिणेतील स्टार्सही दिसणार आहेत.
या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, राघव जुयाल, तेलुगू कलाकार व्यंकटेश दग्गुबाती, जस्सी गिल, शहनाज गिल दिसणार आहेत.