पंजाबमधील अमृतसरला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमेवर बीएसएफ जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. या गस्तीसाठी पायी, घोड्यांवरुन तसंच मोटारबाईकचाही वापर होत आहे. कडाक्याच्या थंडीनंतर या परिसरात सर्वत्र धुकं पडतं आणि त्यामुळे दृश्यमानता कमी होते. त्याचा फायदा घुसखोर अतिरेकी घेण्याची शक्यता असते. अशा संभाव्य घुसखोऱ्या टाळण्यासाठी बीएसएफने गस्त वाढवली आहे या परिसरातील गस्तीसाठीसाठी बीएसएफ जवानांना अत्याधुनिक नाईट व्हिजन कॅमेरेही देण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय सीमेवरील गस्तीसाठी यावेळी महिला सैनिकांनाही प्राधान्य देण्यात आलंय. पुरुष जवानांप्रमाणेच महिला सैनिकही थंडी, ऊन, वारा किंवा पाऊस या पैकी कशाचीही तमा न बाळगता देशाचं सीमाचं रक्षण करतात. अत्याधुनिक तंत्रत्रानाचा वापर करुन अनेकदा ड्रोनच्या सहाय्याने घुसखोरी करुन टेहळणी करण्याचे प्रयत्न केले जातात. बीएसएफने अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत.