अभिनेत्री रुबिना दिलैक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.



रुबिना दिलैकने अभिनयामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.



रूबीनाच्या छोटी बहू आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांनी रुबिनाला खरी प्रसिद्धी मिळाली.



अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा'मध्ये दिसत आहे.



'झलक दिखला जा' शोमध्ये तिचा पार्टनर सनम जोहर आहे.



या कार्यक्रमाच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो रुबिनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये रुबिना पिवळ्या कलरच्या भरतनाट्यमच्या कॉस्ट्युममध्ये फार सुंदर दिसत आहे.



रुबिना दिलैकने नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.



रुबिना दिलैक बिग बॉग सिझन 14 ची विजेती आहे.



'शक्ती' या मालिकेमधील रुबिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



'छोटी बहू' मोठ्या पडद्यावरही झळकली आहे. 'अर्ध' या चित्रपटातून रुबिनाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.