टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक 'बिग बॉस 14' ची विजेती बनल्यापासून सतत चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. नुकतेच रुबिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये, रुबिना दिलैकने सोनेरी प्रिंटेड जंपसूटमध्ये परिधान केला आहे. सोबतच तिने हलका मेकअप आणि कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला. केसांना व्हेव्ह स्टाईल देत ते मोकळे ठेवले आहेत. रुबिना दिलैकच्या या अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहेत. केवळ रुबिनाचा लूकच किलर आहे असे नाही, तर तिचा ड्रेसिंग सेन्सही वाखाणण्याजोगा आहे. या फोटोशूटमध्ये रुबिना नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे, पण यावेळीही ती खूपच बोल्ड दिसत आहे. रुबिना दिलैकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.