एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाचा हॉलिवूडमध्येही बोलबाला पाहायला मिळत आहे. 'ऑस्कर 2023'च्या नामांकन यादीत समावेश झालेल्या या सिनेमाने आता आपल्या नावे आणखी एक विक्रम केला आहे. हॉलिवूडच्या मानाच्या 'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त 'आरआरआर'ने बाजी मारली आहे. 'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाने तीन पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट अॅक्शन पट, सर्वोत्कृष्ट स्टंट्स, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा आणि नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार पटकावल्यानंतर आपला आनंद व्यक्त करतानाचा राजामौलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त 'आरआरआर' या एकमेव भारतीय सिनेमाला पुरस्कार मिळाला आहे. 'आरआरआर' या सिनेमात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. एसएस राजामौलीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. बॉक्स ऑफिसवर 'आरआरआर' या सिनेमाने चांगलाच धुमकूळ घातला होता.