टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली.



आपल्या खेळी दरम्यान त्याने काही नवीन विक्रम रचले.



टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये वेगवान 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.



रोहित शर्माने वर्ल्ड कपमधील 19 डावात ही किमया साधली आहे.



जलदपणे 1000 धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तो पहिला आहे.



मात्र, डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहे. वॉर्नरने 19 डावात 1000 धावा पूर्ण केल्यात.



सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हीलियर्सने 20 डावामध्ये ही किमया साधली.



सर व्हिव रिचर्ड आणि सौरव गांगुली यांनी 21 डावात 1000 धावा पूर्ण केल्यात.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माने केला



अफगाणिस्तानविरोधात तिसरा षटकार मारताच रोहितने हा विक्रम केला.



रोहितने ख्रिस गेलचा 553 षटकार ठोकण्याचा विक्रम मोडला.