भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आज त्याचा 30 वा वाढदिवस आहे



हार्दिक पांड्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय



जगभरातील आक्रमक खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याची गणना केली जाते



फलंदाजी असो किंवा गोलंदाजी भारताच्या अनेक विजयात त्याने मोलाचं योगदान दिले आहे



त्याने 26 जानेवारी 2016 मध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं



आयपीएल 2015 मध्ये त्याने आक्रमक फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवली होती



त्यानंतर भारतीय संघाच्या निवडकर्त्यांची त्याच्यावर नजर पडली



आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं त्यांच्या पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती



ऑस्ट्रेलियात पुढच्या आठवड्यापासून रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात हार्दिक भारतीय संघाचा भाग आहे



हार्दिक पांड्या भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार असल्याचंही अनेक क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे