IPL 2023 : आयपीएलमध्ये विराट कोहलीवर बंदी? पुढच्या सामन्यात घ्यावी लागणार काळजी, अन्यथा चुकवावी लागेल मोठी किंमत



आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघही यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करत आहे.



तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी. मात्र संघातील खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.



विराट कोहलीने मागील दोन सामन्यांमध्ये आरसीबीचं नेतृत्वही केलं आहे. मात्र यादरम्यान विराट कोहली आणि आरसीबी संघासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.



विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. मात्र यादरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली आहे. यामुळे त्याच्यावर बंदीचा धोका निर्माण झाला आहे.



रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर टाकल्या. स्लो ओव्हर रेटमुळे संघाला आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला.



यामुळे स्टँड-इन कर्णधार विराट कोहली आणि संपूर्ण संघाला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार लाखोंचा फटका बसला.



आयपीएलने नेमून दिलेल्या वेळेत आरसीबी संघ 20 षटकं टाकण्यात अयशस्वी ठरल्यामुळे त्याला 24 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला होता.



पहिल्या सामन्यासाठी कर्णधार फाफ डु प्लेसिसला 12 लाख रुपये आणि दुसऱ्या सामन्यासाठी विराट कोहलीकडून 24 लाख रुपये दंड म्हणून घेण्यात आले आहेत.



आता, आरसीबी संघाने पुढील सामन्यातही हा नियम मोडला तर संघाच्या कर्णधाराला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल.



मग संघाचा कर्णधार विराट कोहली असो किंवा फाफ डू प्लेसिस त्यावर एका सामन्यासाठी बंदी घातली जाईल.