रोहित शर्मानं आणखी एका विक्रमाची नोंद केलीय. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहचलाय. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिक (124 सामने) याच्या नावावर होता. रोहितनं आतापर्यंत 125 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलंय. या यादीत मोहम्मद हाफिज तिसऱ्या क्रमांकावर (119 सामने) आहे. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन या यादीत चौथ्या क्रमांकावर (115 सामने) आहे. 113 सामन्यासह बांगलादेशचा महमुदुल्ला पाचव्या क्रमांकावर आहे.