आली समीप लग्नघटीका... रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची लगीनघाई ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले. रोहित गेल्या काही दिवसांपासून गायिका जुईली जोगळेकरला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. काही दिवसांपूर्वी दोघे सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत आहेत. येत्या 5 दिवसात रोहित आणि जुईली लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षावर केला आहे. जुईली ही देखील एक गायिका आहे. दोघांची जोडी सध्या हिट ठरतेय.