कांतारा हा चित्रपट 2022 मधील सर्वात चर्चेत असणारा चित्रपट आहे. कांतारा या चित्रपटाच्या कथानकाचं तसेच चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं थिएटरमध्ये 100 दिवस पूर्ण केले आहेत. गेली 100 दिवस हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवण्यात येत आहे. कांतारानं थिएटरमध्ये 100 दिवस पूर्ण केल्यानंतर होंबले फिल्म्स आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. ऋषभ शेट्टीच्या या पोस्टरवर 100 ग्रँड डेज असं लिहिलं आहे. कन्नड भाषेतील कांतारा हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात आला. 'कांतारा चित्रपटामध्ये ऋषभ शेट्टीसोबतच अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 'कांतारा' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी कांतारा या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं.