अभिनेत्री रवीना टंडन ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये रवीनानं काम केले.



रवीना ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे.







एका नेटकऱ्यानं रवीनाची तुलना ट्विंकल खन्नासोबत केली. त्यानंतर रवीनानं त्या नेटकऱ्याला मजेशीर उत्तर दिलं.



रवीनानं Ask Me A Question या सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.



या सेशनमध्ये एका नेटकऱ्यानं रवीनाला प्रश्न विचारला की, लहानपणी रवीना आणि ट्विंकल खन्ना यांच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं.मला दोघींमधील फरक लवकर लक्षात येत नव्हता.'



चाहत्याच्या या कमेंटवर रवीनानं उत्तर दिलं, 'तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करुन घ्या. त्याच्यासाठी लागणाऱ्या फंडची व्यवस्था केली जाईल.'



रवीनाच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.



अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील रवीना अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.