सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लग्न केलं आहे.



लग्नसोहळ्यासाठी अथिया आणि केएल राहुल यांनी रॉयल लूक केला होता.



अथियानं हाताने विणलेला रेशीमचा लेहंगा आणि सिल्क ऑर्गन्झाचा दुपट्टा असा रॉयल लूक केला होते.



अथियाचा हा लेहंगा अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला होता.



वोगला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनामिका खन्ना यांनी सांगितलं की, हा लेहंगा तयार करायला तिला 10,000 तास लागले.



स्टोनचा चोकर नेकलेस, बिंदी, झुमके, बांगड्या हे दागिने देखील अथियानं लग्न सोहळ्यात परिधान केले होते.



विवाह सोहळ्यातील अथियाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. अथियाच्या या लूकचं अनेकांनी कौतुक केलं.



अथिया आणि केएल राहुल 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.



सुनील शेट्टी यांच्या 'जहान' बंगल्यात 23 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत



कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.