अभिनेत्री सारा अली खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटातील साराचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात सारा अली खान एका महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत आहे.
'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटाची घोषणा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मनं केली आहे.
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करुन या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
अॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सारा एका खोलीमध्ये जाते. त्यानंतर ती त्या खोलीचे दार आणि खिडक्या बंद करते.
टीझरमधील साराच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटाची पटकथा दरब फारुकी आणि कन्नन अय्यर यांनी लिहिली आहे.
सारा अली खान, रिचर्ड भक्ती क्लेन आणि अॅलेक्स ओनेल यांनी 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.