IPL गाजवणारा रिंकू सिंह करतोय 'मालदीव'ची सफर, सिक्स पॅक ॲब्स दाखवणारे फोटो व्हायरल आयपीएलमध्ये तुफान खेळी करणारा रिंकू सिंह सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक तरुण खेळाडूंनी मैदान गाजवलं. त्यातीलच एक म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा खेळाडू रिंकू सिंह. इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या मोसमात रिंकू सिंहच्या बॅटनं कमाल कामगिरी केली. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने सामन्यातील शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार मारून त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. आयपीएल संपल्यानंतर रिंकू सिंह सध्या आता सुट्टीसाठी थेट मालदीवला रवाना झाला आहे. आयपीएलनंतर 25 वर्षीय रिंकू सिंहच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडियावर त्याने अनेक फॉलोअर्स आहेत. रिंकू सिंहने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याने सिक्स पॅक ॲब्स दाखवत पूल साईट फोटोशूट केलं आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या रिंकूला भारतीय टी-20 संघात स्थान मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आयपीएल 2023 मध्ये रिंकू कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वोत्तम फिनिशर ठरला. रिंकूने आयपीएलमध्ये 2018 साली पदार्पण केलं. पण त्याच्या खरी प्रसिद्धी आयपीएल 2023 मध्ये मिळाली.