CSK IPL Record : चेन्नई सुपर किंग्स 10 व्यांदा अंतिम फेरीत, चार वेळा चॅम्पियन CSK चा आतापर्यंतचा प्रवास पाहा



चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. धोनीच्या चेन्नईनं गुजरातचा 15 धावांनी पराभव केला.



चेन्नई सुपर किंग्स हा फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.



सीएसकेने गुजरातसमोर विजयासाठी 143 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. पण, गुजरातला केवळ 157 धावाच करता आल्या. मात्र, गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.



चेन्नई संघ आयपीएलच्या पहिल्या मोसमात म्हणजे आयपीएल 2008 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम फेरीत चेन्नईचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला.



त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2010 च्या अंतिम फेरीत पोहोचला आणि यावेळी संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. आयपीएल 2010 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला.



याशिवाय आयपीएल 2011 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2012 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता.



चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2013 मध्येही अंतिम फेरी गाठली होती, पण यावेळी पुन्हा त्यांची निराशा झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल 2013 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता.



चेन्नई संघ आयपीएल 2015 च्या फायनलमध्ये पोहोचले होते, परंतु मुंबई इंडियन्सकडून विजेतेपदाच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.