Dhoni on Retirement : ''मी संघासाठी नेहमी उपलब्ध असेन...'', धोनीनं निवृत्तीबाबत स्पष्टच सांगितलं



इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.



आयपीएल 2023 महेंद्र सिंह धोनीसाठी शेवटचा हंगाम असेल यानंतर धोनी मैदानावर खेळताना दिसणार नाही, असं बोललं जात होतं.



त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि धोनीच्या चाहत्यांकडून नाराजीचा सूर उमटला होता.



याबाबत निवृत्तीबाबत धोनीनं कोणतीही घोषणा केलेली नव्हती पण, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं.



याबाबत आता खुद्द धोनीनं प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यानं चाहत्यांना आशेचा किरण दाखवला आहे.



यंदाच्या आयपीएल दरम्यान धोनीची निवृत्ती हा एक चर्चित विषय ठरला.



धोनी पुढच्या वर्षीपासून आयपीएल खेळताना दिसणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता.



धोनीनं निवृत्तीबाबत सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत. महेंद्र सिंह धोनीला अजूनही इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घाई नाही.



चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम एस धोनीनं सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना त्याच्या रिटायरमेंटवर भाष्य केलं. यावेळी धोनीनं सांगितलं आहे की, “याबाबत निर्णय घेण्यासाठी माझ्याकड पुरेसा वेळ आहे.



माहीनं पुढे सांगितलं की, ''मी संघासाठी नेहमी उपलब्ध असेन. पुढील आयपीएल हंगामाचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे.”