अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते. रिंकूच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. अनेक नेटकरी रिंकूच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्स करत असतात. रिंकूनं नुकतेच केदारनाथ येथील काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती केदारनाथच्या मंदिराबाहेर उभी राहिलेली दिसत आहे. हर हर महादेव असं कॅप्शन रिंकूनं या फोटोला दिलं आहे. रिंकूनं केदारनाथ येथील शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रिंकूनं काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट डिलीट केल्या होत्या. त्यामुळे ती चर्चेत होती. रिंकूनं तिच्या पहिल्या ट्रेकचे फोटो देखील काही दिवसांपूर्वी शेअर केले होते. सैराट या चित्रपटामुळे रिंकूला लोकप्रियता मिळाली. आता रिंकूच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.