अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या स्टाईलनं नेहमीच नेटकऱ्यांची मनं जिंकते. अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या स्टाईलनं नेहमीच नेटकऱ्यांची मनं जिंकते. पलकच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी पलकला ट्रोल केलं आहे. ब्लॅक कलरचा ड्रेस आणि हाय हिल्स अशा लूकमध्ये पलकनं फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी एका स्मार्ट वॉचच्या ब्रँडची ती शो- स्टोपर झाली होती. पलकच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा रॅम्प वॉक खूप भीतीदायक आहे.' तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?' एक युझर म्हणाला, 'राहूदेत, एका व्यक्तीला प्रत्येक गोष्ट येईलच असं नाही. तू रॅम्प वॉक करु नको. सोशल मीडियावर काही लोक पलकला कुपोषित अशी कमेंट करू ट्रोल करतात.