पांढरे कपडे धुताना त्यात योग्य प्रमाणात डिटर्जंट घालणंही आवश्यक आहे. जास्त डिटर्जंट घातल्यास कपड्यांवर डाग पडू ते निस्तेजही दिसू शकतात.
कोणत्याही वॉशिंग मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुवायला टाकू नका, ज्यामुळे कपड्यातील घाण तशीच राहते.
पांढरे कपडे धुतल्यानंतर ते व्हिनेगर घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवल्याही त्याची दुर्गंधी नाहीशी होते.
पांढर्या रंगाचे कपडे कधीही कोमट पाण्याने धुतल्यास तेलाचे डाग किंवा कपड्यांची दुर्गंधी लगेच दूर होते.
पांढऱ्या कपड्यांचा टोन वाढवायचा असेल तर लिंबूच्या शुद्धीकरण गुणधर्माचा फायदा घ्या.
पांढरे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकले असतील तर ड्रायरमध्ये सुकवण्याआधी ते एकदा तपासा. जर कपड्यांमध्ये कुठे डाग दिसल्यास ते पुन्हा धुवा.
कपड्यांमधून दुर्गंधी काढून टाकण्यासाठी , स्वच्छ करण्यासाठी सुगंधी आणि कमी केमिकल युक्त डिटर्जंट पावडर वापरावी.
व्हिनेगर लावल्याने कपड्यांनवरील घट्ट डाग दूर होण्यास मदत होते.
कच्च्या दुधाचा वापर करून टेबलक्लोथ आणि चादरी त्यांच्या मूळ शुभ्रतेवर पुनर्संचयित केली जाऊ शकतात.
अंडरआर्म आणि मानेवरील कपड्यांवरील घामाचे डाग काढून टाकण्यासाठी, डिटर्जंट, लिंबाचा रस आणि मीठ वापरा.