डोळ्यांच्या आरोग्यासाठी विटामिन सी युक्त फळांचा आहारात समावेश करावा.

डोळे चांगले राहावे यासाठी डोळ्यांच्या योगासनांचा सराव करावा.

डोळ्यांची दृष्टी चांगली राहावी यासाठी त्रिफळा चूर्ण चा वापर देखील तुम्ही करू शकतात.

तुमच्या नियमित आहारामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा.

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी तुम्ही गाजराचा रस आणि पपई यांचा समावेश रोजच्या आहारात करावा.

संगणक समोर बसून काम केल्यामुळे डोळ्यांना थकवा जाणतो त्यासाठी १-२ मिनिटांचा ब्रेक घेऊन डोळ्यांना आराम दया.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी थंडगार पाण्यामध्ये बुडवलेली ग्रीन टी ची बॅग काही काळ डोळ्यांवरती ठेवावीत.

बाहेरून आल्यावर डोळे हे थंडगार स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यावेत. डोळ्यांतील बारीक धुळीचे कण निघून जाण्यास मदत होते.

ताज्या कोरफडीच्या रसाने डोळ्याखालील त्वचेला हळुवारपणे मसाज करा, डोळ्यांखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी मदत होते.

१०

डोळ्यांची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी डोळे बंद करून गुलाब पाण्यात भिजवलेले कापसाचे बोळे १०-१५ मिनिटं ठेवावेत.