कपाटात महागडे कपडे ठेवताना कपडे वॅक्स पेपरमध्ये फोल्ड करून ठेवा.
ओलसर कपडे कपाटात घडी घालून ठेऊ नका.
ओले , दमट कपडे पूर्ण सुकेपर्यंत हवेवर ठेवा.
कपाटात कपडे ठेवण्यापूर्वी कापूरच्या पाण्याने कपाट साफ करा.
कपडे धुताना त्यात बेकिंग सोडा वापरल्याने वास येणार नाही.
कपडे कपाटात ठेवताना ते पेपरमध्ये गुंडाळून ठेवा.
कपाटात डांबर गोळ्या ठेवायला विसरू नका.
शक्य असल्यास तुमचे कपडे गरम किंवा कोमट पाण्याने धुवा.
ज्या पाण्याने तुम्ही कपडे धुणार आहात त्यात लिंबाचा रस मिसळा.
कपड्यांना येणारा दुर्गंध घालवण्याकरता पाण्यात व्हिनेगर मिसळा.