भगवान शंकराच्या 'या' मंदिरात होत नाही 'जलाभिषेक'

Published by: जयदीप मेढे
Image Source: Local 18

भगवान शंकराचा प्रिय असा श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. उत्तर भारतात तो सुरुदेखील झाला आहे.

Image Source: Local 18

या दरम्यान भक्त भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या शिव मंदिरात जातात. तिथे जलाभिषेक करतात.

Image Source: Local 18

बहुतेक शिवमंदिरांमध्ये श्रावणात जलाभिषेक केला जातो. मात्र, भारतातील बाबूगंज येथील शिव मंदिरात जलाभिषेक होत नाही.

Image Source: Local 18

सुगंधित साधेपणात भक्ती

येथे भगवान शंकराची पूजा हळद, अक्षता, चमेलीचे तेल, मोहरीचे तेल आणि फुलांनी केली जाते. एक पारंपरिक प्रथा आहे.

Image Source: Local 18

शतकाहून अधिक काळाची परंपरा

हे मंदिर शंभर वर्षांहूनही अधिक जुनं असल्याचं मानलं जातं आणि आजही श्रद्धेचा दीप तेवत ठेवतं.

Image Source: Local 18

मंत्रजपांनी साकारलेलं मंदिर

हर हर महादेव, शंभू काशी विश्वनाथ – गंगे अशा मंत्रजपांनी मंदिराचा परिसर दिवसरात्र निनादत असतो.

Image Source: local 18

पाण्याविना पण श्रद्धेने परिपूर्ण

पारंपरिक जलाभिषेक इथे नसला तरी श्रद्धेचा ओलावा कायम असतो. भावना आणि श्रद्धा हेच खरे पूजेचे सार या ठिकाणी आहे.

Image Source: Local 18

श्रावण सोमवारची तेजस्वी आरती

श्रावणातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी विशेष आरती घेतली जाते. हजारो दिव्यांनी मंदिर उजळून निघतं.

Image Source: Local 18

इच्छा पूर्ण होणारे स्थान

मान्यतेनुसार, या ठिकाणी आपण जी इच्छा मागू ती पूर्ण होते.

Image Source: Local 18

अकाल मृत्यूपासून संरक्षण

येथे दर्शन घेतल्यास अकाल मृत्यू टळतो, अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे अनेक लोक दरवर्षी या पवित्र स्थळी भेट देण्यास येतात.

Image Source: Local 18

श्रद्धेचा जिवंत वारसा

मंदिराचे प्रमुख महाराज सांगतात की, हे मंदिर केवळ ऐतिहासिक नसून, पिढ्यानपिढ्यांच्या श्रद्धेचा जिवंत केंद्रबिंदू आहे.

Image Source: Local 18