'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील 'जब सैंया' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे गायिका श्रेया घोषालने गायले आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'जब सैंया' हे गाणे आलियाच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. गंगूबाईंच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.