WhatsApp ची प्रसिद्धी कोणापासून लपलेली नाही. भारतासह जगभरात याचे करोडो वापरकर्ते आहेत. या अॅपवर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलची देखील सुविधा आहे. ( Photo Credit- Unsplash )



फोन कॉल रेकॉर्ड करताना तुम्ही अनेक लोकांना पाहिले असेल, पण तुम्हाला WhatsApp कॉल रेकॉर्ड कसा करायचा माहीत आहे का ?( Photo Credit- Unsplash )



खरं तर आज आम्ही अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने WhatsApp Call आणि Video Call चे रेकॉर्डिंग करू शकतो.( Photo Credit- Unsplash )



WhatsApp Audio - Video Call रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही स्क्रीन रेकॉर्डर फीचर वापरू शकता. हे फीचर तुमच्या मोबाईलमध्ये आधीपासूनच असेल तर ते तुम्ही सहज वापरू शकता. ( Photo Credit- Unsplash )



स्मार्टफोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगचे फीचर नसेल तर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डर अॅप इन्स्टॉल करावं लागेल, यानंतर Audio - Video Call दरम्यान फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करावी लागेल. ( Photo Credit- Unsplash )



स्क्रीन रेकॉर्डिंग अॅप मध्येच ऑडिओ रेकॉर्डिंगचे फिचर असते. याच्या मदतीने तुम्ही WhatsApp Audio Call रेकॉर्ड करू शकता. ( Photo Credit- Unsplash )



गुगल प्ले स्टोरवर खूप सारे अॅप उपलब्ध आहेत जे स्क्रीन रेकॉर्डरची सुविधा देतात, अनेक अॅप ही सुविधा विनामुल्य देतात. ( Photo Credit- Unsplash )



प्ले स्टोरवरुन एखादे अॅप घेताना त्याच्या डिस्क्रीप्शन आणि रिव्ह्यू चेक करा जेणेकरून तुमची खाजगी माहिती कोणाकडे जाता कामा नये. ( Photo Credit- Unsplash )



स्क्रीन रेकॉर्डिंगकरिता डाउनलोड केलेल्या कोणत्याही अॅपला अनावश्यक परवानग्या देऊ नका. ( Photo Credit- Unsplash )



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ( Photo Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

लंडनमध्ये भारतीय जास्त की पाकिस्तानी ?

View next story