आपल्या सर्वांना परिचित असलेल्या महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा सचिन विचारे (९ वर्ष) हिने भारताच्या प्रजासत्ताकदिनी नवीन विक्रम रचला आहे. ( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )



भारताच्या प्रजासत्ताकदिनी ग्रिहिथा ने मलेशिया मधील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट किनाबालु (4095.mtrs.) हा पर्वत सर केला आहे. ( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )



माउंट किनाबालु सर करणारी ग्रिहिथा ही भारतातील पहिली सर्वात तरुण महिला ठरली आहे. ( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )



ग्रिहिथाने तिचा प्रवास बोर्निओच्या टिंपोहोन गेटपासून २३ जानेवारीला सुरू केला आणि २६ जानेवारीला सकाळी 7.30 वाजता तिने माउंट किनाबालु चा शिखर गाठला. ( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )



ग्रिहिथाने शिखराच्या माथ्यावर पोहोचुन भारताचा तिरंगा फडकवला. भरताच्या तिरांग्या सोबत नेहमी प्रमाणे तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज हि फडकवला. ( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )



4,095 मीटर (13,435 फूट) उंचीसह माउंट किनाबालु हे तिसरे- पृथ्वीवरील बेटाचे सर्वोच्च शिखर आहे. ( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )



ग्रिहिथाच्या ह्या मोहिमेची Flagoff ceremony ठाणे लोकसभा संसद सदस्य माननीय खासदार श्री.राजन विचारे साहेब व शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. केदार दिघे साहेब ह्यांनी ग्रिहिथाच्या हातात तिरंगा सुपूर्द करुन मोहिमेसाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले होते. ( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )



ह्या आधी ग्रिहिथाने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जगातला सर्वात उंच शिखर (standalone) माउंट Kilimanjaro, आफ्रिका आणि नेपाल मधील Mount Everest base camp sir केले आहेत. ( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )