इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 28 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 ने सरशी घेतली आहे.
भारतीय संघाची सुरुवात पराभवाने झाली आहे. एकवेळ कसोटीवर भारताचे वर्चस्व होतं. पण इंग्लंडने बाजी पलटवली अन् सामन्यात विजय मिळवला. (Image credit - PTI)


भारताने कुठे कुठे चुका केल्या.. या पराभवाला जबाबदार कोण? याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. पाहूयात कोणता खेळाडू नेमका कुठे चुकला?
हैदराबाद कसोटीमध्ये भारतीय संघाचा 28 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी सरासरी राहिली. खासकरुन शुभमन गिल फ्लॉप राहिला. (Image credit - PTI)


शुभमन गिल याला दोन्ही डावात धावा करता आल्या नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल याने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला दोन्ही डावात फक्त 23 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात तर गिल याला खातेही उघडता आले नाही.
वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या गिल याला कसोटीत लय सापडत नाही. तिसऱ्या क्रमांकावर तो सातत्याने फेल जात असल्याचे दिसतेय. भारतीय संघाच्या पराभवाचे हे प्रमुख कारण होय. (Image credit - PTI)


युवा श्रेयस अय्यर याच्याकडून रोहित शर्मा आणि टीम इंडियाला मोठी अपेक्षा होती. पण मध्यक्रममध्ये अय्यर याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अय्यरला हैदराबाद कसोटीत फ्लॉप गेला.
दोन्ही डावात त्याला फक्त 48 धावा करता आल्या. टॉप ऑर्डर फलंदाज फ्लॉप गेल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी अय्यरवर असते, पण त्याला न्याय देता आला नाही. (Image credit - PTI)


दोन्ही डावात अय्यरला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताच्या पराभवाचे हे एक कारण असू शकते. (Image credit - PTI)



अष्टपैलू अक्षर पटेल याने हैदराबाद कसोटीत गचाळ फिल्डिंग केली. ही भारतासाठी महागडी ठरली. अक्षर पटेल याने ओली पोप याचा सोपा झेल सोडला होता. (Image credit - PTI)



त्याने 196 धावांची शानदार खेळी केली. इंग्लंडला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यात ओली पोप याचा सिंहाचा वाटा राहिला. (Image credit - PTI)



अक्षर पटेल याच्याकडून मिस फिल्डिंग झाली नसती तर इंग्लंडला इतकी मोठी धावसंख्या उभारता आली नसती. अक्षर पटेल याने फलंदाजी 61 धावा काढल्या तर गोलंदाजीत तीन विकेट घेतल्या. (Image credit - PTI)



फलंदाजी कमाल दाखवणाऱ्या रवींद्र जाडेजाने गोलंदाजीत खराब कामगिरी केली. इंग्लंडविरोधात दुसऱ्या डावात त्याने सहा चेंडू नो टाकले. त्याला फक्त दोन विकेट घेता आल्या. रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात सात नो चेंडू टाकले. (Image credit - PTI)



अश्विनच्या साथीने रवींद्र जाडेजाला भेदक मारा करणं अपेक्षीत होतं. पण त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात त्याला फक्त दोन विकेट मिळाल्या. फलंदाजीत पहिल्या डावात त्याने 87 धावा केल्या. पण दुसऱ्या डावात फेल गेला.
(Image credit - PTI)


घरच्या मैदानावर मोहम्मद सिराजची गोलंदाजीत धार दिसली नाही. दोन्ही डावात त्याला एकही विकेट मिळाली नाही. सिराजविरोधात इंग्लंडच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा चोपल्या. (Image credit - PTI)



सिराज फ्लॉप ठरल्यामुळे फिरकी गोलंदाजांवर भार जास्त वाढला. जसप्रीत बुमराहला विकेट मिळत असताना सिराजची गोलंदाजी सामन्य वाटत होती. भारतीय संघाच्या पराभवाचे हे प्रमुख कारण असू शकते.
(Image credit - PTI)


Thanks for Reading. UP NEXT

महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा सचिन विचारेने रचला नवा विक्रम

View next story