आरसीबीविरुद्ध सामन्यात उमेश यादवनं केकेआरचा सलामीवीर अनूज रावत आणि विराट कोहलीला बाद करून ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. या कामगिरीमुळं उमेश यादवनं पावर प्लेमध्ये 49 केट्स घेण्याचा विक्रम केलाय. या यदीत पंजाबचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 53 विकेट्सची नोंद आहे. त्यानंतर झहीर खान आणि भुवनेश्वर कुमार 52 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात उमेश यादव दिल्लीच्या संघाचा भाग होता. परंतु, त्याला दिल्लीकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्लीच्या सघानं त्याला रिलीज केलं. त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये केकेआरच्या संघानं त्याला विकत घेतलं. या हंगामातील पहिल्याच सामन्यात त्यानं चेन्नई विरुद्ध दोन विकेट्स मिळवत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.