उन्हाळ्याच्या दिवसांत टॅनिंगची समस्या उद्भवणे सामान्य आहे.



बाजारत मिळणारे महागडे सनस्क्रीन पुन्हा पुन्हा वापरणे प्रत्येकाला शक्य नसते.



बटाट्यामुळे चेहऱ्याच्या टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते.



चेहऱ्यावर कच्चा बटाटा, गुलाबजल आणि मुलतानी माती एकत्र करून लावा.



चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बटाटा आणि हळदीचा फेस पॅक लाभदायी ठरतो.



यासाठी अर्धा बटाटा किसून, त्यात चिमूटभर हळद घाला. हा पॅक मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा.



हा पॅक चेहऱ्यावर अर्धा तास तसाच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.



अशा प्रकारे तुम्ही दिवसातून एकदा तुम्ही हा पॅक चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंगची समस्या लवकर दूर होईल.