वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पलक तिवारी सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली.
पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
पण, आता सोशल मीडियावर काही लोक तिला सडपातळपणावरून ट्रोल करत आहेत.
सोशल मीडिया सेन्सेशन पलक तिवारीने अलीकडेच बॉलिवूड बबलशी खास संवाद साधताना, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला ‘स्किनी’ म्हणत आणि ट्रोल केल्याबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘कलाकार कसे दिसतात, कसे राहतात याविषयी चर्चा करणाऱ्या लोकांनी आता गप्प बसावे, कारण त्यांच्या मताने कुणालाही काही फरक पडत नाही. हे लोक स्वतःवरच खुश नाहीत.’