हार्दिक पांड्याने आतापर्यंत 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत यामध्ये त्यानं 54 विकेट घेतल्या आणि 989 धावा केल्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 148.5 इतका आहे हार्दिक एकदिवसीय सामन्यांमध्ये अधिक यशस्वी ठरला आहे कदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 66 सामन्यांमध्ये 63 विकेट घेतल्या असून 1 हजार 386 धावा केल्या आहेत एकदिवसीय सामन्यात त्याची फलंदाजी सरासरी 34 धावांची आहे. हार्दिक कसोटी क्रिकेटमध्ये तितका प्रभावी ठरलेला नाही आतापर्यंत त्याला 11 कसोटी खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यात त्यानं 17 विकेट घेतल्या आहेत आणि 532 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आज 29 वर्षाचा झालाय आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळल्यासाठी भारतीय संघासोबत हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाला दाखल झालाय जिथे तो विश्वचषकाची तयारी करत आहे