मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आजच्या दिवशीचा खेळ सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली सर्व खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधली होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने दमदार खेळी करत शतक पूर्ण केले आहे. अश्विन 61 धावांवर बाद झाला. रविंद्र जाडेजानं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं दुसरं शतक झळकावलं. जाडेजा आणि अश्विनच्या भागिदारीनं भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. जाडेजाच्या खणखणीत खेळीमुळं भारतानं पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली आहे.