अभिनेत्री रवीना टंडन ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. रवीनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सुपरहिट चित्रपटांमध्ये रवीनानं काम केले. रवीनानं नुकतेच तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रवीनानं ब्राऊन आऊटफिट, गोल्डन इअरिंग्स आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. 'Brown girl in the Ring' असं कॅप्शन रवीनानं या फोटोला दिलं आहे. अंदाज अपना अपना आणि मोहरा यांसारख्या चित्रपटांमधील रवीनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोहरा चित्रपटातील रवीनाचे 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. रवीनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. रवीनाचा वेलकम टू द जंगल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.