बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा काल (9 डिसेंबर) विवाह सोहळा पार पडला



नुकतीच अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने विकी आणि कतरिनाला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.



अनुष्काने विकी आणि कतरिनाचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'दोघांचे अभिनंदन. तुमचे लग्न झालंय म्हणून मला खूप आनंद झाला आहे कारण आता तुम्ही लवकरच तुमच्या नव्या घरात शिफ्ट व्हाल.'



पुढे अनुष्काने लिहीले, 'आता आम्हाला तुमच्या नव्या घराच्या कन्स्ट्रक्शनचा आवाज देखील येणार नाही.



अनुष्काच्या या पोस्टमधून असे लक्षात येते की विकी आणि कतरिना हे विरूष्काच्या घरा शेजारीच शिफ्ट होणार आहेत.



एका रिपोर्टनुसार, विरूष्का यांच्या सि-फेसिंग फ्लॅट शेजारीच कतरिना आणि विकीने एका फ्लॅट भाड्याने घेतला आहे.



कतरिना आणि विकीच्या फोटोवर आलिया भटने कमेंट केली, 'तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसत आहात.'



प्रियांका चोप्राने कमेंट केली, 'आज मेरी यार की शादी है, दोघांना शुभेच्छा '.



दीपिका, मनीष मल्होत्रा, ऋतिक रोशन, जाह्नवी कपूर, श्वेता बच्चन, टाइगर श्रॉफ आणि परिणीति चोप्रा या सेलिब्रिटींनी देखील विकी आणि कतरिनाला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.