अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या अवॉर्ड नाईटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच रश्मिकाच्या नवीन फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर लक्ष वेधले.

अलीकडेच रश्मिका मंदान्नाला विमानतळावर माध्यमांनी कॅमेऱ्यात कैद केले.

रश्मिका मंदान्नाचा एअरपोर्ट लूक नेहमीच चर्चेत असतो.

यावेळीही रश्मिकाने विमानतळावर साध्या पद्धतीने प्रवेश केला.

रश्मिका मंदान्ना पांढऱ्या रंगाची कुर्ती परिधान करून खूपच सुंदर दिसत होती.

रश्मिकाने उंच पोनीटेलसह तिचा लूक पूर्ण केला.

रश्मिकाचे बिना मेकअप स्मितहास्य प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

रश्मिकाने तिच्या आवडत्या चाहत्यांसाठी वेळ काढला आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढले.

रश्मिका मंदान्नाचा दबदबा आता केवळ साऊथ इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे.

पुष्पाच्या यशानंतर रश्मिकाही बॉलीवूडमध्ये येत आहे. रश्मिका सध्या बॉलिवूडच्या टॉप स्टार्ससोबत काम करत आहे.