जगभरात अद्यापही कोरोनाचा फैलाव सुरु आहे. भारतातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी वीस हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सक्रिय कोरोना रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20,044 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे देशात कोरोनाबळींचा आकडा 5 लाख 25 हजार 660 वर पोहोचला आहे आदल्या दिवशी देशात 20 हजार 38 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 47 रुग्णांचा मृत्यू झाला होता देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 301 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.