साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.



यादरम्यान, रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चांमुळे प्रसिद्धी झोतात आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप काहीही खुलासा केलेला नाही.



आता रश्मिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतेच पूलमधील फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये तो पूलमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.



'पुष्पा'ची ‘श्रीवल्ली’ अर्थात रश्मिका मंदना इन्स्टाग्रामवर तिचे व्हेकेशन फोटो शेअर करत आहे. फोटोंमध्ये रश्मिका तिच्या मालदीव व्हेकेशनचा खूप आनंद घेताना दिसत आहे.



स्विमसूटमधील लेटेस्ट फोटो शेअर करताना रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'वॉटर बेबी'. रश्मिकाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.



दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना केवळ दक्षिण भारतातच नाही, तर देशभरात लोकप्रिय आहे.



तिचा प्रत्येक लूक, प्रत्येक अदा चाहत्यांच्या मनाला भुरळ घालते. तिच्या एका स्माईलने चाहत्यांची मने हरपून जातात.



रश्मिका मंदना अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सिझलिंग अवतारात दिसत आहे.



रश्मिका नुकतीच ‘गुडबाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या चित्रपटात ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली आहे.