साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली होती. चेन्नईत झालेल्या ग्रँड लग्न सोहळ्यानंतर हे जोडपे विशेष चर्चेत होते.



आता लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच, दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नयनतारा आणि विग्नेश ही जोडी जुळ्या मुलांची पालक झाली आहे.



नुकतीच विग्नेश शिवन याने सोशल मीडियावर नयनतारासोबत मुलांच्या पायाचे चुंबन घेतानाची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर नयनतारा आणि विग्नेश्वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



विग्नेश शिवन यानेने सोशल मीडियावर चार फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो आणि नयनतारा मुलांच्या छोट्या पावलांचे चुंबन घेताना दिसत आहेत, तर कधी त्यांच्यासोबत खेळताना दिसत आहेत.



विग्नेशने मुलांच्या पायांशिवाय नयनताराचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने चिमुकल्या बाळाचा पाय धरलेला दिसत आहे.



दोघेही आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील या फोटोंवर नयनताराचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.



विग्नेश आणि नयनतारा आई-बाबा झाल्याबद्दल चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. विग्नेश शिवनच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहते या जोडीवर आणि त्यांच्या नवजात बाळांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.



मात्र, लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच नयनतारा आणि विग्नेश आई-वडील झाल्याबद्दलही काही चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.



मात्र, साऊथच्या या स्टार जोडप्याने सरोगसीच्या माध्यमातून आपल्या जुळ्या मुलांचे या जगात स्वागत केले असावे, अशी अटकळ चाहते बांधत आहेत.