'NMACC'च्या लॉन्चच्या दुसऱ्या दिवशी रश्मिका मंदान्नाने हजेरी लावली. रश्मिका मंदान्ना सध्या विजय देवरकोंडा सोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. दुसरीकडे रश्मिका आता बेलमकोंडा श्रीनिवासला डेट करत असल्याची चर्चा आहे. आता डेटिंगच्या चर्चेदरम्यान रश्मिका थेट 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'मधील एका कार्यक्रमाला पोहोचली आहे. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या कार्यक्रमादरम्यान रश्मिकाने काळ्या रंगाचा बॉडी फिटेड गाउन परिधान केला होता. रश्मिकाचे काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रश्मिकाच्या फोटोवर 'ब्युटी इन ब्लॅक' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. रश्मिका मंदान्नाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. रश्मिकाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. बोलके डोळे आणि गोड हास्याने रश्मिकाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.