'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान राधिका मर्चंटने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राधिका मर्चंटच्या ब्लॅक लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटनादरम्यान राधिकाने 'Shahab-Durazi' या ब्रॅंडची इन्डो-वेस्टर्न साडी नेसली होती. राधिकाच्या साडीवरील फ्लोरल एम्ब्रॉएडरी खूपच खास होती. काळी साडी, मोकळे केस, हलका मेकअप आणि डायमंड नेकलेस असा काहीसा राधिकाचा लुक होता. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यानचे राधिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यानचा राधिकाचा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यादरम्यान हजेरी लावलेल्या विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींचं राधिकाने स्वागत केलं. राधिका मर्चंटला शास्त्रीय नृत्याची प्रचंड आवड आहे. राधिकाने मुंबईतील श्री निभा आर्ट अकादमीमध्ये गुरु भावना ठक्कर यांच्याकडून शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.