उर्फी जावेद नेहमी कोणत्या तरी कारणांनी चर्चेत असते. उर्फीला ती परिधान करत असलेल्या कपड्यांवरून तिला ट्रोल केले जाते. सध्या उर्फी आपल्या कपड्यांवरून नव्हे तर वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. उर्फीने चक्क लोकांची माफी मागितली आहे. उर्फीने ट्वीट करत चाहत्यांची आणि लोकांची माफी मागितली आहे. आता आपण स्टाइल बदलणार असल्याचे उर्फीने म्हटले आहे. अजब प्रकारचे कपडे परिधान करून भावना दुखावल्या असल्यास माफ करा, असे तिने म्हटले. आजपासून तुम्हाला वेगळी उर्फी दिसेल असे तिने म्हटले. मी आता कपडे आणि स्टाइलिंग बदलणार आहे, असेही उर्फीने म्हटले. उर्फी परिधान करत असलेल्या कपड्यांवरून सोशल मीडियावर चर्चा झडल्या आहेत. आता उर्फी नेमकी कोणती नवीन स्टाइल फॉलो करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.