'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला मुकेश अंबानीपासून ईशा अंबानीपर्यंत सर्वांचाच शाही थाट पाहायला मिळाला. नीता अंबानी यांनी निळ्या रंगाची बनारसी साडी तर मुकेश अंबानी यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. ईशा अंबानी 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला पारंपारिक पेहरावात दिसली. नीता अंबानी यांनी निळ्या रंगाची बनारसी साडी नेसली होती. मुकेश अंबानी यांचा धाटका मुलगा अनंत अंबानी होणाऱ्या पत्नीसह अर्थात राधिका मर्चंटसोबत दिसला. राधिकाने काळ्या रंगाची साडी नेसली होती. आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या रोमॅंटिक फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. श्लोका मेहतानेदेखील आकर्षक साडी नेसली होती. श्लोका मेहताच्या कुटुंबियांनीदेखील 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरचा उद्धाटन सोहळा पार पडला आहे. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' हे देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र आहे. सिनेजगतातील मंडळींसह, क्रीडा, संगीत, मॉडेलिंग आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला हजेरी लावली होती.