साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.
लवकरच ती महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘गुड बाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच रश्मिकाने आपल्या मानधनात अर्थात फीमध्ये वाढ केली आहे.
अल्लू अर्जुनसोबतच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे रश्मिकला तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर रश्मिकाला आगामी चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्मात्यांची रांग लागली आहे.
लवकरच रश्मिका अभिनेता अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’मध्ये झळकणार आहे. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘पुष्पा 2’ची देखील क्रेझ निर्माण झाली आहे.
तर, दुसरीकडे साऊथमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता रश्मिका तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे.
रश्मिका मंदनाने ‘पुष्पा 2’साठी 4 कोटी रुपये फीची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, हा चित्रपट रिलीज होण्याआधीच रश्मिकाने तिची फी वाढवून तब्बल 5 कोटी केली आहे.
मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या रश्मिका प्रचंड चर्चेत आहे.
त्यामुळे रश्मिका आपल्या आगामी चित्रपटात झळकावी यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. मात्र, वाढती प्रसिद्धी पाहून अभिनेत्रीने तिचे मानधन देखील वधारले आहे.