आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरयांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले आहे. सहा दिवसामध्ये या चित्रपटानं जवळपास 161 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटानं 45 कोटी कमावले. चौथ्या दिवशी या चित्रपटानं 16 कोटींची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (13 सप्टेंबर) या चित्रपटानं जळपास 12.50 कोटींची कमाई केली आहे. बुधवारी (14 सप्टेंबर) 11 कोटींची कमाई या चित्रपटानं केली आहे. चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे.