नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नुकताच रश्मिकाचा 'पुष्पा- द राइज' हा चित्रपट प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की रश्मिका प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत आहे. न्यू ईयर सेलिब्रेशन करण्यासाठी रश्मिका आणि विजय हे गोव्याला गेले होते. गोव्यामधील एका स्विमिंग पूलच्या जवळचा फोटो रश्मिकाने सोशल मीडियावर शेअर केला. विजयचा भाऊ आनंद देवरकोंडा याने देखील त्याच स्विमिंग पूल जवळचा फोटो शेअर केला. असा अंदाज लावला जात आहे की, न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी रश्मिका ही विजयच्या कुटुंबासोबत गोव्याला गेले होती. रश्मिकाच्या पोस्टमुळे आता विजय आणि तिच्या अफेअरबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे.