अभिनेत्री रश्मिका मंदाना तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे
नुकतेच रश्मिकाने इंस्टाग्राम ट्रेडिशनल अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये रश्मिका लाल साडीमध्ये दिसत आहे
या साडीवर तिनं मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज घातलं आहे
लाईट मेकअप, रेड लिपस्टिक आणि मोकळे केस असा रश्मिका कातील लूक या फोटोंमध्ये दिसत आहे
रश्मिकाच्या या अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत
रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे
रश्मिका लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबॉय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे
याशिवाय रश्मिका मंदान्ना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' चित्रपटात झळकणार आहे
रश्मिकाला 'पुष्पा' या तेगुलू चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली