अभिनेत्री नुसरत भरुचाचा समावेश टॉप अभिनेत्रींमध्ये होतो. नुसरतने 'जय संतोषी माँ' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. नुसरत गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. नुसरतनं नुकतेच लाल साडीतील फोटो शेअर केलेत नुसरतचे साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'लव्ह, सेक्स और धोका', 'प्यार का पंचनामा' सारख्या चित्रपटातून नुसरत भरुचाला खरी ओळख मिळाली होती. नुसरतने टीव्ही मालिकांमधून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं, मात्र, चित्रपटांमध्ये झळकल्यावर तिला खरी लोकप्रियता मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुसरतनं आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीमधून केली होती. 2002 मध्ये झी टीव्हीच्या 'किटी पार्टी' या सीरियलमध्ये दिसली होती. त्यानंतर सोनी वाहिनीवरील 'सेव्हन' या मालिकेतंही काम केलं. 'किटी पार्टी' मालिकेतमधली तिची भूमिका अगदी छोटीशीच होती. तर, 'सेव्हन' मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती.