अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रियाने आपले ग्लॅमरस लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
तसेच मराठी सिने-सृष्टीतील अनेक कलाकारदेखील तिच्या फोटोंवर कमेंट्स करताना दिसून येत आहेत.
प्रिया मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आजपर्यंत तिने अनेक दर्जेदार मालिकांमध्ये काम केले आहे.
अभिनेत्री प्रिया मराठे ही आजवर अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.
प्रिया मराठेला खलनायकी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक वाटतं. प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखांचा राग येतो त्या साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं तिला वाटतं.