बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहनं नुकतेच त्याचे खास फोटो शेअर केले आहेत.
अमेरिकेमध्ये शुक्रवारी (18 फेब्रुवारी) रात्री नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या 'ऑल-स्टार सेलेब्रिटी गेम' मध्ये रणवीरनं सहभाग घेतला.
दरवर्षी एनबीएचे आयोजन केले जाते.
रणवीर सिंहने यावर्षी क्लीवलँड, अमेरिकेमध्ये कॉमेडियन टिफनी हॅडिश, मशीन गन केली, जॅक हार्लो यांसारख्या आर्टिस्टसोबत खेळामध्ये सहभाग घेतला.
फोटोमध्ये रणवीर काही कलाकारांसोबत बास्केटबॉल कोर्टमध्ये जाताना दिसत आहे
रणवीर सिंह जेव्हा कोर्टमध्ये एन्ट्री करतो तेव्हा अनाउंसर म्हणतो, 'क्राउडमधून येणार आवाज हा रणवीरच्या चाहत्यांचा आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 38.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. '
रणवीरनं बास्केटबॉल खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
रणवीरला फुटबॉल आणि बास्केटबॉल हे खेळ खेळायला आवडतात. त्यानं एनबीए या गेमचे काही फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'बॉल इज लाइफ'.